PM मोदींना प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराचा व्हिसा अचानक रद्द, भारतात येण्यापासून रोखल्याचं म्हणत थेट गृहमंत्रालयावर आरोप

Helle Lyng Visa Row हैदराबादमध्ये होणाऱ्या भारत समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पत्रकार हेले लिंग भारतात येणार होत्या. मात्र विमानतळावर जाण्याच्या काही मिनिटे आधी भारतीय दूतावासाने व्हिसा रद्द झाल्याचा फोन केला.
Helle Lyng Visa Row

Helle Lyng Visa Row

Esakal

Updated on: 

नॉर्वेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी प्रश्न विचारल्यानं चर्चेत आलेल्या पत्रकार हेले लिंग यांचा भारत समिटसाठी येताना अचानक व्हिसा रद्द करण्यात आलाय. पत्रकार हेले लिंग यांनी आपल्याला भारतात येण्यापासून रोखल्याचा दावा केला आहे. हैदराबादमध्ये होणाऱ्या भारत समिटमध्ये सहभागी होण्यासाठी त्या भारतात येणार होत्या. मात्र विमानतळावर जाण्याच्या काही मिनिटे आधी भारतीय दूतावासाने त्यांना फोन केला. भारतात प्रवास करता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...