भाजपमध्ये असल्याने तेथे मला बोलू दिले गेले नाही : शाझिया इलमी

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षामध्ये असल्यानेच आपल्याला जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात तोंडी तलाक विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात बोलू दिले गेले नसल्याचा दावा भाजप नेत्या शाझिया इलमी यांनी केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना इलमी म्हणाल्या, "तोंडी तलाक या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले होते. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे; ज्यावर आपण बोलायला हवे. मात्र आयोजकांवर प्रचंड दबाव होता. त्यांना असे वाटले की शाझिया जर बोलली तर परिसरात एक प्रकारचे गोंधळाचे वातावरण निर्माण होईल. मी कधीही कोठेही गोंधळाचे वातावरण निर्माण केलेले नाही. मी नेहमीचे हिंसेविरुद्ध बोलले आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे मी नेतृत्त्व केले आहे. मला बोलू दिले नाही कारण मी भाजपमध्ये आहे. हा उघडउघड भेदभावाचा प्रकार आहे.'

दिल्ली विद्यापीठाच्या रामजस महाविद्यालयात आणि गुरमेहर कौर यांच्या संदर्भातील वादग्रस्त घटनांच्या पार्श्‍वभूमीवर इलमी यांच्याबाबत घडलेला प्रकार समोर आला आहे.

Web Title: Not allowed to speak in Jamia event because I am in BJP : Shazia Ilmi