esakal | केंद्र आणि बंगाल सरकार पुन्हा आमने सामने; अमित शहांचे ममता बॅनर्जी यांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Not Allowing Migrants Trains Injustice Amit Shah To Mamata Banerjee
  • केंद्र-बंगाल सरकारमध्ये तू-तू, मै-मै
  • स्थलांतरित मजुरप्रश्‍नी सहकार्य करत नसल्याची तक्रार

केंद्र आणि बंगाल सरकार पुन्हा आमने सामने; अमित शहांचे ममता बॅनर्जी यांना पत्र

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरातील स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून श्रमिक रेल्वे सुरू केलेली असताना राज्यांकडून मात्र अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहले आहे. पश्‍चिम बंगालचे असंख्य मजुर परराज्यात अडकले असून त्यांना गावी जायचे आहे. मात्र पश्‍चिम बंगाल सरकारकडून रेल्वेला परवानगी दिली जात नसल्याचे शहा यांनी नमूद केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमित शहा यांनी पत्रात म्हटले की, स्थलांतरित मजुरांवर ममता बॅनर्जी सरकार अन्याय करत आहे. पश्‍चिम बंगाल सरकारच्या या भूमिकेमुळे स्थलांतरित मजुरांची स्थिती बिकट होत आहे. दुसरीकडे तृणमूल कॉंग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी मात्र अमित शहांचे आरोप फेटाळून लावत आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी, अशी मागणी केली आहे. यादरम्यान कॉंग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी पश्‍चिम बंगाल सरकारकडून ८ रेल्वेगाड्यांची मागणी करण्यात आल्याचे सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र काम करावे आणि परराज्यात फसलेल्या कामगारांना पश्‍चिम बंगालमध्ये परत आणण्याचे नियोजन करावे, अशी मागणी केली.

काँग्रेसला मोठा धक्का; एजेएलच्या संपत्तीवर अखेर ईडीची टाच

अडीच लाखाहून अधिक मजुरांना लाभ
गृहमंत्रालयाचे सह सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाले की, मजुर, विद्यार्थी भाविक आणि पर्यटकांना घरी पोचवण्यासाठी देशभरात आतापर्यंत २२२ रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. या सेवेचा अडीच लाखाहून अधिक प्रवाशांनी लाभ घेतला आहे.

भीषण : ट्रकमधून लपून घरी जाणाऱ्या ५ मजुरांचा अपघातात मृत्यू

कोरोनाबाधितांच्या संख्येवरून मतभेद
कोरोना संसर्गावरून पश्‍चिम बंगाल सरकार आणि केंद्रात नवीन वाद निर्माण झाला आहे. तत्पूर्वी कोरोना संसर्ग आणि त्यापासून होणाऱ्या मृतांच्या संख्येवरून दोन्ही सरकार समोरासमोर आले होते. केंद्र आणि बंगाल सरकार बाधितांचे वेगवेगळे आकडे जाहीर करत आहे. आतापर्यंत पश्‍चिम बंगालमध्ये कोरोनाचे १६७८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ३२३ रुग्ण बरे झाले आहेत, तर १६० जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु ममता सरकारच्या मते, ७० जणांचाच मृत्यू झाला आहे. अन्य रुग्णांचा मृत्यू हा अन्य कारणांमुळे झाला आहे.

कोव्हिड पथकावरूनही वाद
पश्‍चिम बंगाल सरकार आणि केंद्रात कोव्हिड टीमवरूनही वाद निर्माण झालेला आहे. गेल्या महिन्यात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने पश्‍चिम बंगालमध्ये पथक पाठवले होते. परंतु त्यावर ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी गुजरातची स्थिती अधिक खराब असताना तेथे केंद्राचे पथक पाठवले जात नसल्याबद्धल टीका केली होती. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने सहा अंतर्गत मंत्रालय पथकांची नियुक्ती केली होती. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पश्‍चिम बंगालला याबाबत निर्देशही दिले होते. त्यानंतर एक पथक कोलकता तर दुसरे पथक जलपायगुडी येथे पोचले होते. या पथकाने कोलकता, हावडा, पूर्व मेदिनीपूर, उत्तर चोवीस परगना, दार्जिलिंग, कॅलिम्पोंग आणि जलपायगुडीला संवेदनशील म्हणून सांगितले होते.