esakal | कर्नाटकातील नेतृत्व बदलाची पुन्हा चर्चा; येडियुरप्पा म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

yediyurappa

कर्नाटकात नेतृत्व बदलाची पुन्हा चर्चा; येडियुरप्पा म्हणाले...

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : कर्नाटकचे (Karnataka) मुख्‍यमंत्री बी एस येडियुरप्‍पा (CM BS Yediyurappa) यांना भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने तातडीने दिल्लीत बोलावून घेतले आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला राजकीय वर्तुळात पुन्हा वेग मिळाला आहे. येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत चर्चा केलीय. तुम्ही राजीनामा देणार आहात का? या प्रश्नावर येडियुरप्पा यांनी अजिबात नाही, असं उत्तर दिलंय. (Not at all says Karnataka CM BS Yediyurappa on being asked if he has resigned)

हेही वाचा: फेसबुक लोकांचा जीव घेतंय; बायडन यांनी केला आरोप

त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी बातचित केली असता ते म्हणाले की, मी राजनाथ सिंह, अमित शहा, जेपी नड्डा यांच्याशी बोलेन. मेकेदातू प्रकल्पासाठी परवानगी मिळण्यासाठी जलसंपदा मंत्री यांच्याशीही भेटलो. काल मी पंतप्रधानांशी भेटलो. आम्ही राज्याच्या विकासासंदर्भात बातचित केली. मी पुन्हा ऑगस्टमध्ये येणार आहे. राजीनाम्याच्या चर्चांमध्ये कसलाही अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

येडियुरप्पा यांना काल शुक्रवारी दिल्लीत तातडीने बोलावून घेण्यात आले आहे. ते एका विशेष विमानाने दुपारी दिल्लीत पोचले. येडियुरप्पा यांनी काल संध्याकाळी उशिरा पंतप्रधान मोदी व शहा यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे वृत्त आहे. कर्नाटकात असंतुष्ट भाजप आमदारांनी येडियुरप्पा हटाव मोहीम तीव्र केली आहे. राज्याच्या प्रशासकीय कारभारात येडियुरप्पा यांच्या दोन्ही मुलांचा हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढल्याने मंत्री वैतागले आहेत. वय झाल्याने येडियुरप्पा यांची प्रशासनावरील पकड ढिली झाली असून त्याचा फायदा त्यांची मुले घेत असल्याची भाजप आमदारांची तक्रार आहे. गेले काही महिने भाजपमधील असंतुष्ट मंत्री व आमदारांनी दिल्ली दौरे करून शहा यांच्या कानावर येडियुरप्पा यांच्याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यांच्याबाबतची एक कथित सीडीही भाजप नेतृत्वापर्यंत पोहोचविली गेली आहे. दरम्यान, येडियुरप्पा यांच्या दिल्लीतील गाठीभेटीचा कार्यक्रम व घटनाक्रम पाहिला तर दिल्लीतून त्यांना तातडीने हटविण्यात येईल का, याबाबत भाजप सूत्रांनी साशंकता व्यक्त केली.

हेही वाचा: 'आम्हाला माहिती नाही'; दानिश यांच्या मृत्यूवर तालिबानने झटकले हात

ही तर सदिच्छा भेट: आर. अशोक

दरम्यान, येडियुरप्पा यांचा दिल्ली दौरा पंतप्रधानांची व शहांची सदिच्छा भेट घेणे व कावेरी पाणीवाटप वादाबद्दल जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी चर्चा करण्यासाठी आहे, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येते आहे. येडियुरप्पा यांचे समर्थक मंत्री आर अशोक यांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे त्यात वेगळे काही नाही. कावेरी मुद्दा कर्नाटक व तमिळनाडू यांच्यातील वर्षानुवर्षे धुमसणारा मुद्दा आहे व येडियुरप्पा यांचा दौरा मुख्यतः त्याच विषयावर आहे. कर्नाटकात नजीकच्या भविष्यात नेतृत्व बदल होणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

loading image