esakal | 'आम्हाला माहिती नाही'; दानिश यांच्या मृत्यूवर तालिबानने झटकले हात
sakal

बोलून बातमी शोधा

'आम्हाला माहिती नाही'; दानिश यांच्या मृत्यूवर तालिबानने झटकले हात

'आम्हाला माहिती नाही'; दानिश यांच्या मृत्यूवर तालिबानने झटकले हात

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली: भारतीय छायाचित्र पत्रकार दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूबद्दल तालिबानने खेद व्यक्त करत म्हटलंय की आम्हाला माहिती नाही की नेमकं कोणत्या गोळीबारात पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. आम्हाला हे माहिती नाहीये की, त्यांचा मृत्यू कसा झाला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी दानिश यांच्या मृत्यूसंदर्भात सीएनएन न्यूज १८ शी बोलताना ही माहिती दिलीय. भारतीय छायाचित्र पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा शुक्रवारी अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तांकन करताना मृत्यू झाला आहे. त्यांची ही हत्या तालिबानींनी केल्याचं म्हटलं जात असली तरी आता तालिबानने यावर स्पष्टीकरण देत हात झटकले आहेत. त्यांच्या या हत्येशी आपला काहीच संबंध नसल्याचं तालिबानने म्हटलं आहे. इतकचं नव्हे तर दानिश यांच्या मृत्यूबद्दल तालिबानने शोक देखील व्यक्त केलाय. दानिश यांचे पार्शिव शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसकडे सोपवण्यात आलं आहे. (We dont know Taliban denies role in photojournalist Danish Siddiquis death)

हेही वाचा: "हेट स्पीच देणं नवी फॅशन झालीय; असे लोक कोरोनापेक्षाही घातक"

पुढे त्यांनी म्हटलंय की, युद्ध क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कुणाही पत्रकाराने आम्हाला कळवणं अपेक्षित आहे. आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ शकू. मात्र, त्यांच्या या मृत्यूबद्दल आम्हाला खेद आहे. आम्हाला याचाही खेद वाटतोय की पत्रकार आम्हाला माहिती न देता युद्ध क्षेत्रात प्रवेश करत आहेत.

कंदहार प्रांतामधील स्पीन बोल्डाक या मुख्य बाजारपेठेच्या भागात मागील दोन दिवसांपासून अफगाणिस्तान लष्कर आणि तालिबान्यांमध्ये गोळीबार सुरु आहे. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्यांना तालिबान पाकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या रुग्णालयांमध्ये उपाचारांसाठी नेत असल्याची माहिती एएफपीने दिलीय.

हेही वाचा: दुर्दैवी! चिमुकल्याला वाचवायला गेलेल्या दहा जणांवर काळाचा घाला!

रॉयटर्स इंडिया’या वृत्तसंस्थेचे मुख्य छायाचित्र पत्रकार असलेले सिद्दिकी ४० वर्षांचे होते. त्यांना जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार प्राप्त झाला होता. कंदहारमध्ये तालिबानी बंडखोर आणि अफगाण सैन्यात सुरू असलेल्या चकमकीचे ते छायाचित्रण करत होते. अफगाणिस्तानची खास सुरक्षा पथके कंदहार प्रांतामधील स्पीन बोल्डाक हा मुख्य बाजारपेठेचा भाग तालिबान्यांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी लढत आहेत. शुक्रवारी पहाटे तेथे तालिबानी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये हल्ले-प्रतिहल्ले झाले. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात सिद्दिकी यांच्यासह एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला

"काल रात्री कंदहारमध्ये आमचा मित्र दानिश सिद्दिकीचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून खूप दु:ख झालं. भारतीय पत्रकार आणि पुल्तिझर पारितोषिक विजेते दानिश सिद्दिकी अफगाण सुरक्षा दलासंबंधी वृत्तांकन करत होते. ते काबूलला जाण्यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वीच मी त्यांना भेटलो होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि रॉयटर्सच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत" असे अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुंदझे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

loading image