esakal | Video : मी मोदींच्या मीडियाला घाबरत नाही : राहुल गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul_Gandhi

मधेपुरा येथील सभेतही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली.

Video : मी मोदींच्या मीडियाला घाबरत नाही : राहुल गांधी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Bihar Election 2020 : अरारिया (बिहार) : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ‘मोदी मतदान यंत्र’ असून ‘मी एमव्हीएम किंवा मोदीजींच्या मीडियाला घाबरत नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले.

Breaking : आणखी ३ राफेल विमानं भारतात दाखल!​

बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निवडणूक प्रचारात बोलत असताना त्यांनी मोदी व इव्हीएम यंत्राची तुलना केली. ‘‘एमव्हीएम असो वा मोदीजींचा मीडिया मी त्याला घाबरत नाही. सत्य हे सत्य आहे, न्याय हा न्याय आहे. या माणसाविरोधात मी विचारसरणीचे युद्ध खेळत आहे. त्यांच्या विचारांविरोधात आमचा लढा आहे. आम्ही त्यांच्या विचारांचा पराजय करू,’’ असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी कोणत्याही घटनेचा उल्लेख न करता ‘‘नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सभांमधून माझ्याविषयी कटू गोष्टी कथन केल्या. ते द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत तर मी प्रेमाची पखरण करीत आहे. द्वेषाने द्वेषाला हरवू शकत नाही. केवळ प्रेमाचा विजय होतो. मोदींना हरविल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही,’’ असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

अपयश लपविण्यासाठी राज्य सरकार दडपशाही करतंय; भाजप नेत्याची टीका​

गरिबांना मदत नाही, पण मतांची मागणी
मधेपुरा येथील सभेतही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली. कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये मोदी व नितीश कुमार यांनी गोरगरिबांना मदत केली नाही, पण आता ते त्यांच्याकडे मते मागत आहेत, असे ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)