esakal | Breaking : आणखी ३ राफेल विमानं भारतात दाखल!
sakal

बोलून बातमी शोधा

Rafale

सध्या राफेल विमानासाठी वेगवेगळ्या बॅचमधील वैमानिकांना फ्रान्समध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.

Breaking : आणखी ३ राफेल विमानं भारतात दाखल!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली (पीटीआय) : शत्रूला धडकी भरवणाऱ्या राफेलच्या तीन विमानाचा दुसरा ताफा बुधवारी (ता.४) फ्रान्सहून बुधवारी रात्री ८.१४ वाजता गुजरातच्या जामनगर हवाई तळावर दाखल झाला. यासंदर्भात हवाई दलाने ट्विटरवर माहिती दिली आहे. फ्रान्सहून भारताकडे झेपावलेल्या राफेल विमानांनी वाटेत कोठेही थांबा घेतला नाही. तत्पूर्वी राफेलच्या पाच विमानाचा ताफा २८ जुलै रोजी भारतात पोचला होता. या विमानांचा १० सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला आहे.

CTET 2020: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर; राज्यात नाही एकही नवे केंद्र​

हवाई दलाला आणखी तीन राफेल लढाऊ विमाने मिळाली. बुधवारी सकाळी तीनही राफेल विमान फ्रान्सकडून भारताकडे झेपावले. भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल विमान खरेदी करण्याबाबत करार केला आहे. यानुसार बुधवारी तीन विमान दाखल झाल्याने आता राफेल विमानांची एकूण संख्या आठ झाली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनशी संबंध ताणलेले असताना लडाख येथे राफेल विमान तैनात केले आहेत.

सध्या राफेल विमानासाठी वेगवेगळ्या बॅचमधील वैमानिकांना फ्रान्समध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. भारताला फ्रान्सकडून पुढील वर्षात एकूण २१ विमान मिळणार आहेत. सध्या भारताकडील राफेल विमानांची संख्या आत आठ आहे. दसॉल्ट कंपनी जानेवारीत आणखी तीन विमाने भारताला सुपूर्द करतील. त्यानंतर मार्च महिन्यात तीन विमान आणि यानंतर सात विमानांचा ताफा दिला जाईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image