Income Tax Department : प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला नोटीस

क हजार ७०० कोटी रुपयांचा भरणा करण्याची नोटीस पक्षाला पाठवली
काँग्रेस
काँग्रेसesakal

नवी दिल्ली : प्राप्तिकरासंदर्भातील पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला आव्हान देणारी काँग्रेस पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर खात्याने एक हजार ७०० कोटी रुपयांचा भरणा करण्याची नोटीस पक्षाला पाठवली आहे. आर्थिक चणचणीमुळे आधीच अडचणीत आलेल्या काँग्रेससाठी ही नोटीस धक्कादायक मानली जात आहे.

काँग्रेस
Mental Health: मेंटली चेकआउट म्हणजे काय? जाणून घ्या लक्षण अन् उपाय

मागील काही वर्षांतील काँग्रेसच्या कराचे पुनर्मूल्यांकन (टॅक्स रिअॅसेसमेंट प्रोसिडिंग) करण्याचा निर्णय प्राप्तिकर खात्याने घेतला होता. त्याला काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र पक्षाची याचिका मागील गुरुवारी न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर एक हजार ७०० कोटींचा भरणा करावा, असे सांगत प्राप्तिकर खात्याने काँग्रेसला नवी नोटीस पाठवली आहे.

कर, दंड आणि या सर्वांवरील व्याजाचा या रकमेत समावेश असल्याचे प्राप्तिकर खात्याने म्हटले आहे. प्राप्तिकर विभागाकडून केली जात असलेली कारवाई अन्यायकारक आणि लोकशाहीविरोधी असल्याचे पक्षाचे नेते विवेक तन्खा यांनी सांगितले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com