
SL Bhyarappa
E-sakal
Mysuru: सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांचे बुधवारी बंगळूरु येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचं वय ९४ वर्षे होतं. बंगळूरुमधील राष्ट्रोत्थान रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
एस. एल. भैरप्पा यांना हृदयरोगाचा त्रास होता. सहा महिन्यापूर्वी ते सकाळी फिरायला गेले असता जागीच कोसळले. त्यांना उपचारासाठी बंगळूरु येथे हलविण्यात आले होते. ते शहरात एका अतिथीगृहामध्ये वास्तव्याला होते.
हसन जिल्ह्यातल्या चन्नरायपटना तालुक्यातल्या संथेशिवरा येथील रहिवाशी असलेले भैरप्पा यांनी हसन आणि म्हैसूर जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतलं. पुढे गुजरात आणि नवी दिल्लीसह देशातल्या अनेक भागांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं.