रेल्वे आरक्षणासाठी 'आधार' होणार अनिवार्य

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जुलै 2016

नवी दिल्ली - रेल्वे प्रवासाच्या तिकिटांच्या आरक्षणासाठी लवकरच ‘आधार‘ क्रमांक अनिवार्य होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

आतापर्यंत विविध सरकारी योजनांसाठी आधार क्रमांकाचा वापर करण्यात येत होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सरकारी योजनांसह इतरत्रही आधार क्रमांकाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वे तिकिटांचा काळा बाजार रोखण्यासाठी आधार क्रमांक रेल्वे तिकिटांशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सुरूवातीला केवळ आरक्षित तिकिटांसाठीच आधार क्रमांक अनिवार्य करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात  विविध सवलतींद्वारे रेल्वे प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक आदींच्या तिकिट आरक्षणासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व आरक्षित तिकिटांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात येईल. आधार क्रमांक देऊन रेल्वे तिकिट काढल्यानंतर प्रवासादरम्यान रेल्वेचा तिकिट तपासनीस त्याच्याकडील उपकरणात आधार क्रमांक देऊन प्रवाशाची माहिती, छायाचित्र पाहू शकेल.

Web Title: now, aadhar card mandatory for Railway booking

टॅग्स