आता अम्मा नाहीत; मोदीच आमचे 'डॅडी'! 

आता अम्मा नाहीत; मोदीच आमचे 'डॅडी'! 

चेन्नई : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे 'एआयएडीएमके'च्या सर्व कार्यकर्त्यांचे वडील आहेत. म्हणूनच आम्ही त्यांचे नेतृत्त्व मान्य केले आहे', असे विधान तमिळनाडूचे मंत्री के. टी. राजेंद्र बालाजी यांनी केले. 'एआयएडीएमके'च्या दिवंगत नेत्या जयललिता यांनी भाजप आणि कॉंग्रेसपासून अंतर राखण्यास प्राधान्य दिले होते. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 'एआयएडीएमके'च्या नेत्यांनी भाजपशी युती केली आहे. 

बालाजी म्हणाले, 'अम्मा (जयललिता) जिवंत होत्या, तेव्हा पक्षावर त्यांचीच पूर्ण पकड होती. त्या स्वत:च सर्व निर्णय घेत असत. पण आजची परिस्थिती वेगळी होती. आता अम्मा नाहीत. त्यामुळे मोदी हेच आमचे 'डॅडी' आहेत. मोदी हे संपूर्ण भारताचेच 'डॅडी' आहेत. त्यामुळे त्यांचे नेत्तृत्व आम्ही मान्य केले.'' 

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि एआयएडीएमके या दोन पक्षांनी तमिळनाडूमध्ये युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com