New Delhi : पीएफ हस्तांतरासाठी आता केंद्रीकृत प्रणाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पीएफ हस्तांतरासाठी आता केंद्रीकृत प्रणाली

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) आजच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली असून पीएफ खात्यांच्या केंद्रीकृत प्रणालीला मंजुरी देण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले. अर्थात, खासगी कर्मचाऱ्यांना नोकरी बदलताना आपले पीएफ खाते हस्तांतरित (ट्रान्सफर) करण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील ईपीएफओच्या २२९ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीकृत प्रणालीला मंजुरी मिळाल्यानंतर आता याद्वारे कर्मचाऱ्यांचे जुने पीएफ खाते नव्या खात्यात स्वयंचलितरित्या विलीनीकृत होईल. सध्याच्या स्थितीनुसार एखाद्या कर्मचाऱ्याने जुनी नोकरी सोडून नव्या कंपनीत नोकरी स्वीकारल्यास त्याला त्या कंपनीत नव्याने पीएफ खाते सुरू करावे लागते किंवा आधीच्या खात्यातील रक्कम खातेधारकाला हस्तांतरित करून घ्यावी लागते. त्यासाठी जुन्या कंपनीशीसंबंधित काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते; परंतु आता पीएफ खाते स्वयंचलितरित्या विलीनीकृत करता येत असल्याने याची गरज भासणार नाही. ईपीएफओच्या झालेल्या बैठकीत आणखी काही मुद्द्यांवर चर्चा झाली असून यात व्याज वाढण्यापासून पेन्शनधारकांची पेन्शन १ हजार रुपयांवरून ३ हजार रुपये केली जाण्याची शक्यता आहे.

loading image
go to top