esakal | आता इंजेक्शनची गरज नाही, नाकातूनही घेता येणार कोरोना लस!
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus_20testing

नाकातून लस (नेझल स्प्रे) देता यावी, यासाठी भारत बायोटेक संशोधन करत आहे.

आता इंजेक्शनची गरज नाही, नाकातूनही घेता येणार कोरोना लस!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना लस निर्माण करणाऱ्या देशातील दोन कंपन्यांना भारत सरकारने मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांमध्येच देशात लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या लशी इंजेक्शनद्वारे दिल्या जातात. पण, नाकातून लस (नेझल स्प्रे) देता यावी, यासाठी भारत बायोटेक संशोधन करत आहे. विशेष म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या फेजची ट्रायल नागपूरमध्ये होणार असल्याचं कळत आहे. 'आज तक'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचला मृतदेह; उडाली एकच खळबळ

भारत बायोटेकने वॉशिंग्टन विद्यापीठाशी करार केला आहे. त्यानुसार कोरोनाची लस इंजेक्शनच्या माध्यमातून न देता, नाकातून देण्यासाठी संशोधन केले जात आहे. त्यामुळे लवकरच नेझल स्प्रे लस लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) 3 जानेवारी रोजी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लशींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. या दोन्ही लशी इंजेक्शनद्वारे हातावर दिल्या जाणार आहेत. 

नेझल लशीचा लोकांना केवळ एकच डोस घ्यावा लागणार आहे. हा सगळ्यात चांगला पर्याय असल्याचा दावा, भारत बायोटेतचे डॉ. कृष्णा यांनी केलाय. भारत बोयोटेक लवकरच या लशीच्या ट्रायलसाठी डीसीजीआयकडे प्रस्ताव पाठवणार आहे. कारण नेझल स्प्रे लस इंजेक्शनपेक्षाही परिणामकारक असल्याचं डॉ. चंद्रेशखर म्हणाले आहेत. येत्या काही दिवसात नेझल लशीचे ट्रायल सुरु केले जाणार आहे.

देशातील विविध शहरात नेझल लसीचे ट्रायल घेतले जाणार आहे. नागपूर, पुणे, हैदराबाद या शहरांमध्ये सुरुवातीला याचे ट्रायल होईल. यासाठी 18 ते 65 वयोगटातील एकूण 40-45 स्वंयसेवकांची निवड केली जाईल. सर्वकाही सुरळित राहिल्यास नेझल स्पे लस लोकांना मिळण्यास सुरुवात होईल.  

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सौरव गांगुलींनी दिली प्रतिक्रिया

नेझल स्प्रे लस म्हणजे काय?

नेझल स्रे लस नाकातून दिली जाते. सहसा नाकातूनच विषाणूचा फैलाव होतो, त्यामुळे नाकातून लस दिल्याने त्याची परिणामकारकता वाढते. नाकातून लस दिल्यास इम्यून रिस्पॉन्स चांगला असतो. यामुळे नाकातून येणारे इन्फेक्शन रोखले जाते, असं वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनच्या अभ्यासात सांगण्यात आलंय. नाकातून दिली जाणारी लस कमी धोकादायक आणि तिचा शरीरावर परिणाम लवकर दिसून येतो. त्यामुळे नाकातून देण्यात येणाऱ्या लसीला मंजुरी मिळाल्यास ही लस कोरोनाच्या लढाईत गेम चेंजर ठरू शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. 


 

loading image