पेट्रोलपंपावर मिळणार दोन हजार रुपये

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर बॅंक आणि पोस्ट कार्यालयामध्ये गर्दी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आता देशभरातील निवडक दोन हजार पेट्रोलपंपांवर रोख रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पेट्रोलपंवार कार्ड स्वाईप करून रोख दोन हजार रुपये उपलब्ध होणार आहेत. ही सुविधा केवळ स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांनाच उपलब्ध आहे. मात्र हळूहळू ही सुविधा इतर बॅंकांसाठीही उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून बॅंकांवरील भार कमी होण्यास काही प्रमाणात मदत होण्याची आशा आहे. सध्या केवळ भारतीय स्टेट बॅंकेची पीओएस मशिन असलेल्या पेट्रोल पंपावर दिवसाला दोन हजार रुपये देण्याची सुविधा उपलब्ध आहे. एसबीआय आणि रिझर्व्ह बॅंकेच्या संयुक्त उद्यमाने सुरु झालेल्या उपक्रमात इतर बॅंकांनादेखील सहभागी करुन घेतले जाईल, अशी माहिती एका पेट्रोलपंपावरील अधिकाऱ्याने दिली आहे.

Web Title: Now, get Rs 2,000 cash from petrol pumps