वय झालंय, आता फक्त सल्ला देऊ शकतो; ज्येष्ठ नेत्याची भाजपवरच टीका

वय झाल्याने भाजपच्या नियमांनुसार मी सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचे ज्येष्ठ नेते तथागत रॉय म्हणाले
भाजप
भाजपटिम ई सकाळ

भाजपचे ज्येष्ठ नेते तथागत रॉय यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिलाय. तथागत रॉय यांनी ट्वीट करत आपले वय झाले.आपण आता फक्त सल्ला देऊ शकतो,असे म्हटले. त्यांच्या या ट्वीटने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 10 महिन्यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने बुधवारी नागरी संस्थांमध्येही आपला डंका वाजवला.यात भाजपलाही पराभवाचा सामना करावा लागला.या निवडणुकीच्या निकालानंतर तथागत रॉय यांना फोन येत होते.या संदर्भात त्यांनी ट्वीट करत सांगितले.

भाजप
पृथ्वी संवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत पानी फाऊंडेशन जगात अव्वल

तथागत रॉय म्हणाले, “मला फोन येत आहेत,तुम्ही तिथे बसून ट्विट करण्याशिवाय दुसरे काही का करत नाही?" आता स्ट्रेट राहण्याची गरज आहे. माझे वय ७७ आहे आणि भाजपच्या नियमांनुसार मी सक्रिय राजकारणापासून दूर आहे.मी माझे म्हणणे अधिकाऱ्यांना सांगितले. माझे काम झाले आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com