
One Nation, One Time: सर्व क्षेत्रामध्ये अचूक भारतीय प्रमाणवेळ निश्चितीसाठी भारतीय कालमानक नियमांमध्ये सुधारणा केली जात असून लवकरच ‘एक देश, एक वेळ’ या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. या धोरणानुसार संरक्षण क्षेत्र, बॅंका, विमा क्षेत्र, मोबाइल सेवा यासह सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये एकाच अचूक भारतीय प्रमाण वेळेचे पालन होईल आणि सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींसाठी देखील हीच प्रमाणित वेळ मान्य असेल.