
Maruti Chitampalli Passes Away : महाराष्ट्रातील अरण्यऋषी अशी ख्याती असलेले ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी भाषेमध्ये सुमारे लाखभर नव्या शब्दांची भर घालणारे वन्यजीव संशोधक मारुती चित्तमपल्ली यांचं वृद्धापकाळानं बुधवारी सोलापुरात निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेले काही दिवस आजारी आणि रुग्णालयात उपचार घेत होते. तीन चार दिवसांपूर्वीच त्यांना (पुतण्याच्या) घरी आणले होतं. नुकताच ३० एप्रिल २०२५ रोजी त्यांचा 'पद्मश्री' हा नागरी किताब देऊन गौरव करण्यात आला होता.