भारतीय मुलींशी विवाह करून परदेशात पळण्यात 'एनआरआय' आघाडीवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

नवी दिल्ली : भारतीय तरूणींशी विवाह करून परदेशात पळून जाण्याचे प्रमाण अनेकदा अनिवासी भारतीयामध्ये (एनआरआय) जास्त आहे. एनआरआय तरूणांशी विवाह केल्यानंतर काही महिन्यानंतर घटस्फोट आणि विवाहाच्या नावावर धोका दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत पीडित तरुणींनी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात मदत मागितली आहे.  

भारतात वास्तव्यास असताना देशातील मुलींशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून त्यांच्याशी विवाह केला जात असल्याचे समोर आले. मात्र, त्यानंतर संबंधित मुलीशी विवाह केल्यानंतर काही व्यक्ती परदेशात पळून जाण्याचे प्रकार अनेकदा समोर आले. तसेच देशातील संबंधित विवाहतेला पतीच्या अनुपस्थितीत घराबाहेर काढल्याचे अनेक प्रकरणही समोर आहेत. त्यामुळे 200 हून अधिक व्यक्तींना पंजाब, उत्तरप्रदेश, दिल्ली, बरेली, लखनौच्या तरुणींनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाबाबत सांगितले. या सर्व प्रकाराने पीडिता तरूणींनी याबाबत केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.  

Web Title: NRI Running Abroad After Marrying Indian Girls 200 Girls Sought Help From Government