अजित डोवाल यांच्या सुरक्षेत मोठी चूक, 3 कमांडो निलंबित

फेब्रुवारी महिन्यात एका संशयित व्यक्ती ने सकाळी 7 वाजुन 45 मिनीटांनी कार घेवून त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता
अजित डोवाल यांच्या सुरक्षेत मोठी चूक, 3 कमांडो निलंबित

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल याच्या सुरक्षेत झालेल्या चुकी मुळे संबंधीत तीन अधिकार्‍यांना निलंबित केला आहे. फेब्रुवारीमध्ये जेव्हा एक वाहन त्यांच्या घराच्या गेटवर पोहोचले तेव्हा हे कमांडो एनएसएच्या संरक्षणात गुंतले होते. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. गृह मंत्रालयाच्या माहिती नुसार VIP सुरक्षा संबंधित DIG आणि कमांडंटची बदली झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात एका संशयित व्यक्ती ने सकाळी 7 वाजुन 45 मिनीटांनी कार घेवून त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्या व्यक्तीला सुरक्षा आधिकाऱ्यांनी पकडून त्याला अटक केली. सुरवातीला व्यक्ती मानसिक तणावात आसल्याच सांगण्यात आले होत. अटक केलेला व्यक्ती कर्नाटक मधील बेंगळुरू मधील रहिवाशी आहे. सांगितल जात आहे की या व्यक्तीने नोएडा मधून लाल रंगाची SUV कार भाड्याने घेतली होती.

अजित डोवाल यांच्या सुरक्षेत मोठी चूक, 3 कमांडो निलंबित
Mere Desh Ki Dharti Trailer: गावच्या पोरांनी शहराकडं जायचचं कशाला?

ही कार घेवून तो अजित डोवाल यांच्या घरी गेला होता. कार गेटच्या आत घालण्याच्या आधीच त्या पकडले. अजित डोवाल यांची सुरक्षा CISF करत आहे. त्यांना गृह मंत्रालया कडून Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. पकडलेल्या व्यक्ती काही मनाशीच बडबड करत होता, तो म्हणत होता की त्याच्या शरिरात कोणीतरी चिप बसवली आहे. आणि त्याला कोणतरी कंट्रोल करत आहे.

आजित डोवाल यांच्या सुरक्षेत एकुण 58 जवान आहेत यात 10 सशस्त्र स्थिर रक्षक, 6 PSO, 24 जवान, 5 वॉचर्स (दोन शिफ्टमध्ये) आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com