Mere Desh Ki Dharti Trailer: गावच्या पोरांनी शहराकडं जायचचं कशाला?

कोरोनानंतर मनोरंजन विश्वात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत, जे चित्रपट आले आहेत त्याचे विषयही पूर्णपणे वेगळे असल्याचे दिसून आले आहे.
Mere Desh ki Dharti News
Mere Desh ki Dharti Newsesakal

Mere Desh Ki Dharti Trailer: कोरोनानंतर मनोरंजन विश्वात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत, जे चित्रपट आले आहेत त्याचे विषयही पूर्णपणे वेगळे असल्याचे दिसून आले आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. विशेष करुन बॉलीवूडपेक्षा (Entertainment News) टॉलीवूडच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचा ओढा आहे. प्रभावी मांडणी, शंभर टक्के मनोरंजनाची हमी आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांनी (Bollywood Movie) उचलून धरले आहे. आता एका नव्या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. त्यामध्ये मेरे देश की धरती या चित्रपटाचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. त्यामध्ये (Bollywood Actor) मिर्झापूरमधून लाईमलाईटमध्ये आलेल्या मुन्नाभैय्या अर्थात दिव्येंदुच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. आता तो एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

पहिल्यापासूनच ग्रामीण आणि शहरी हा भेद वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला आहे. बॉलीवूडमध्ये 80 ते 90 च्या दशकांत ग्रामीण भाग जेवढा समोर आला तेवढा तो 2000 नंतर आलेला दिसला नाही. त्यात ग्रामीण वास्तव, शेतकरी, शेतकरी आत्महत्या यावर आधारित विषय हिंदीमध्ये फारसे दिसले नाहीत. इतर भाषांधील चित्रपटांना त्यामध्ये स्थान मिळाले, जगाच्या पाठीवर त्याचे कौतुकही झाले. भारत हा कृषीप्रधान देश आहे. असे म्हटले जाते. मात्र त्याच देशात शेतकऱ्यांना वेगळ्या माध्यमातून सादर केले जाते. यासारख्या वेगवेगळ्या प्रश्नांवर भाष्य करणारा चित्रपट मेरे देश की धरती हा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याची चर्चा रंगली होती. त्याचा ट्रेलर आता व्हायरल झाला आहे.

Mere Desh ki Dharti News
Photo Viral: मुलासोबत आमिर खान घेतोय आंब्याचा आस्वाद!

गावकडच्या मुलांनी शहरात जायचेच कशाला, असं वाक्य फेकून दिव्यांदु आपल्या बरोबरीच्या मुलांना नवीन काही करु असं सांगतो. वेगळं काही करुन पैसे कमविण्याची इच्छा असणाऱ्या त्या तरुणांना कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, शेतकरी म्हटल्यावर कोणत्या प्रकारची संकंट समोर उभी राहतात हे मेरे देश की धरतीच्या माध्यमातून समोर आले आहे. हा चित्रपट येत्या 06 मे ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शन फराज हैदर यांनी केले असून नील चक्रवर्ती यांनी त्याचे लेखन केले आहे.

Mere Desh ki Dharti News
Bhool Bhulaiyaa 2 Trailer: मंजुलिका परत आलीय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com