'एनएसजी'च्या कमांडोंना लष्करीतळावर प्रशिक्षण 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवादविरोधी कारवाईला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला सुरवात केली आहे. श्रीनगरजवळील हमहाहा येथील सीमा सुरक्षा दलाच्या तळावर जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे. डझनभर स्नायपर्स, रडार यंत्रे आणि एनएसजीचे कमांडो काश्‍मीर खोऱ्यामध्ये दाखल झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. 
 

नवी दिल्ली: काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवादविरोधी कारवाईला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला सुरवात केली आहे. श्रीनगरजवळील हमहाहा येथील सीमा सुरक्षा दलाच्या तळावर जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे. डझनभर स्नायपर्स, रडार यंत्रे आणि एनएसजीचे कमांडो काश्‍मीर खोऱ्यामध्ये दाखल झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. 

राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे कमांडो हे काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये गरजेनुसार सहभागी होतील. मागील दोन आठवड्यांपासून काही कमांडोंना काश्‍मीर खोऱ्यातच प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या "बीएसएफ'च्या केंद्रांवर "एनएसजी'ची शंभर माणसे तैनात करण्यात आली आहेत. "एनएसजी'च्या बहुतांश कमांडोंना विमान अपहरणाला सामोरे जाण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याने त्यांना विमानतळांवरच तैनात केले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मागील महिन्यामध्येच गृहमंत्रालयाने काश्‍मीरमध्ये "एनएसजी'चे कमांडो तैनात करण्यास परवानगी दिली होती. राज्यात राज्यपाल राजवट लागू झाल्याने सर्व सूत्रे एन. एन. व्होरा यांच्या हाती आली आहेत. त्यामुळे केंद्रीय पातळीवर लष्करी मोहिमांबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: NSG Commando Training on milatry camp