esakal | Video : प्रज्ञा ठाकूर यांना ऐकून घ्यावं लागलं, 'आतंकवादी वापस जाओ' 
sakal

बोलून बातमी शोधा

nsui workers raise slogans against mp sadhvi pragya at bhopal

एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी "प्रज्ञा ठाकुर गो बॅक', 'आतंकवादी वापस जाओ' म्हणत घोषणाबाजी केली. एएनआय या वृत्तसंस्थेनं त्याचा व्हिडिओ शेअर केलाय.

Video : प्रज्ञा ठाकूर यांना ऐकून घ्यावं लागलं, 'आतंकवादी वापस जाओ' 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

भोपाळ : भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना नॅशनल स्टुडंट्‌स युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयुआय) कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करत "गो बॅक'च्या घोषणा दिल्या आहेत. माखनलाल चतुर्वेदी युनिव्हर्सिटी (एमसीयू) बाहेर दोन विद्यार्थीनींनी धरणे आंदोलन केले होते. त्यांना भेटण्यासाठी बुधवारी खासदार प्रज्ञा ठाकूर एमसीयुमध्ये आल्या होत्या. त्या वेळी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी "प्रज्ञा ठाकुर गो बॅक', 'आतंकवादी वापस जाओ' म्हणत घोषणाबाजी केली. एएनआय या वृत्तसंस्थेनं त्याचा व्हिडिओ शेअर केलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोठे झाली घोषणाबाजी?
प्रज्ञा ठाकूर यांनी विद्यार्थीनींशी चर्चा केल्यानंतर रेक्‍टर आणि कुलगुरुंशी चर्चा करत असताना एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. विद्यार्थीनींना परीक्षेला बसू द्यावे अशी आमचीही मागणी आहे. मात्र, प्रज्ञा ठाकूर यांच्यासारख्या दहशतवाद्यांना विद्यापीठात घुसू देणार नाही असे म्हणत, एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वादग्रस्त घोषणाबाजीविरुद्ध कारवाई केली जाईल, असे प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या. एका खासदाराला कार्यकर्त्यांनी दहशतवादी म्हटले आहे. त्यांनी एका महिला खासदाराचा, संविधानिक पद असलेल्या व्यक्तीचा अपमान केला असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. 

आणखी वाचा - दहा नावांनी ढवळून काढलं महाराष्ट्राचं राजकारण

एका खासदाराचा उल्लेख त्यांनी दहशवादी असा केला आहे हे अतिशय बेकायदेशीर आणि अशोभनीय आहे. त्यांनी एका महिला लोकप्रतिनिधिला शिवीगाळ केली आहे. एका घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला शिव्या दिल्या आहेत. ते सगळे गद्दार आहेत. मी निश्चितच त्यांच्या विरोधात कारवाई करीन.
- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, खासदार, भोपाळ

loading image