esakal | Vidhan Sabha 2019 : अर्ज भरायला एक मिनिट उशीर झाला अन्....
sakal

बोलून बातमी शोधा

number of Candidates suffer loss for being late to filing of nomination for maharashtra vidhan sabha elections

हरियानातील कर्नाल जिल्ह्यातल्या नीलोखेडी आणि कर्नाल विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरणाऱ्या तीन जाणांना उशीर झाला आणि ते पुढच्या पाच वर्षांसाठी निवडणूकीला मुकले.

Vidhan Sabha 2019 : अर्ज भरायला एक मिनिट उशीर झाला अन्....

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कर्नाल : वेळेचं महत्त्व काय असतं हे सांगायची गरज नाही. प्रत्येकाला वेळेचं महत्त्व हे चांगलंच माहिती असतं. पण कधी कधी वेळेचं महत्त्व न समजल्याने त्याचा मोठा तोटा अनेकांना भोगावा लागलाय. असाच काहीसा प्रकार घडलाय हरियानातील कर्नाल विधानसभा मतदारसंघात. काही नेत्यांना विधानसभा निवडणूकीचा फॉर्म भरायला एक मिनिट उशिर झाला आणि पुढच्या पाच वर्षांसाठीची संधी ते घालवून बसले. 

Vidhan Sabha 2019 : पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही पार्किंगला जागा न मिळाल्याने हुकली संधी

काल (ता. 4) हरियाना व महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. हरियानातील कर्नाल जिल्ह्यातल्या नीलोखेडी आणि कर्नाल विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरणाऱ्या तीन जाणांना उशीर झाला आणि ते पुढच्या पाच वर्षांसाठी निवडणूकीला मुकले. यात महत्त्वांच्या पक्षाचे नेते तसेच अपक्ष उमेदवारही होते. त्यांना यायला एक ते पाचट मिनिटे उशिर झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्विकारण्यास नकार दिला. अर्ज भरण्याची वेळ दुपारी तीनपर्यंत होती. तीननंतर येणाऱ्या एकाही जणाचा अर्ज स्विकारला गेला नाही.

Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांकडे कोट्यवधींची मालमत्ता, पण....

ज्या नेत्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही, त्यामध्ये माजी मंत्री राजकुमार वाल्मिकी यांचाही समावेश आहे. अर्जाला नोटरी अटेस्टेड नसल्याने ते पुन्हा या कामासाठी गेले यात दोन मिनिटे गेल्याने त्यांचा अर्ज स्विकारला गेला नाही. तर वाढडा येथे एका उमेदवाराला पाच मिनिटे उशिर झाल्याने त्याचा अर्ज नाकारला. जनता पक्षाच्या लाल सिंह यांनाही उशिर झाल्याने अर्ज भरता आला नाही. अंबाला सिटी विधानसभा मतदारसंघात अकाली दलाचे उमेदवार अभय चौटाला यांचे नाव अचानक जाहीर झाले. त्यामुळे त्या धावपळीत त्यांना अर्ज भरण्यास उशिर झाला व त्यांची उमेदवारी हुकली.

पार्किंगला जागा न मिळाल्याने विधानसभेची संधी हुकली
पुणे : विधानसभा निवडणूक लढवायचा निर्धार करून सर्व तयारी केली, पक्षाने एबी फॉर्म पण दिला, पण निवडणूक कार्यालयाजवळ गाडी लावायला पार्किंग लवकर न मिळाल्याने पाच मिनीट उशीर झाला, अन विधानसभा निवडणूक लढण्याची संधीच गमावली. तर दुसऱ्या उमेदवाराला तीन मिनिटे उशीर झाल्याने अर्ज न भरता माघारी जावे लागले. ही घटना घडली रिपाईचे (कांबळे गट) राजन कांबळे आणि आंबेडकर राईट्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे उमेदवार हनुमंत नलावडे यांच्यासोबत.