Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांकडे कोट्यवधींची मालमत्ता, पण....

विनायक बेदरकर
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

कोथरूड भागातून भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी एकूण मालमत्ता दोन कोटी 59 लाख 1 हजार जाहीर केले आहे.
‎यामध्ये स्थावर मालमत्ता हा कॉलम जंगम मालमत्ता तसेच सोने आणि वाहन हे सर्व कॉलम रिकामेच आहेत.

कोथरूड (पुणे) : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीमध्ये त्यांची संपत्ती दोन कोटी 59 लाख 51 हजार रुपये जाहीर केली आहे. मात्र, पाटील यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता व स्वतःचे वाहनही नाही.

Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांच्या पराभवासाठी विरोधक एकवटले

विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताना स्थावर व जंगम मालमत्ता बाबतचे विवरणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुपूर्त केले आहे. या उमेदवारांमध्ये कोथरूड भागातून भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी एकूण मालमत्ता दोन कोटी 59 लाख 1 हजार जाहीर केले आहे.
‎यामध्ये स्थावर मालमत्ता हा कॉलम जंगम मालमत्ता तसेच सोने आणि वाहन हे सर्व कॉलम रिकामेच आहेत. पाटील यांच्याकडे स्थावर मालमत्ता काहीच नाही. जंगम मालमत्ता ही नाही. सोने ही दाखवण्यात आले नाही. तसेच त्यांच्याकडे चारचाकी आणि दुचाकी वाहन असल्याची माहितीही देण्यात आली नाही. 

Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये येणार 'राज वादळ'!

पुणे शहरातील जवळपास सर्व उमेदवार प्रमुख पक्षाचे सर्व उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यातच पुण्यातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे चंद्रकांत पाटील यांची मालमत्ता ही मालमत्ता ही कोट्यवधीच्या घरात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP kothrud assembly constituency candidate have 59 lakhs 51 thousand of asset