भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहोचली सव्वा लाखावर...

वृत्तसंस्था
शनिवार, 23 मे 2020

- सध्या देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1,25,101 वर.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1,25,101 वर गेली आहे. तर आत्तापर्यंत 3,720 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील विशेष बाब म्हणजे 51,784 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या 180 हून अधिक देशांत कोरोनाचा संसर्ग पाहिला मिळत आहे. जगभरात सव्वा तीन लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. तर सध्या 51 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही याच्या प्रमाणात वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीतून हे सर्व स्पष्ट झाले आहे. भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 1,25,101 झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या 24 तासात 6,654 नवे प्रकरणं

गेल्या 24 तासात 6,654 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 137 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. 

Latest Kokan Live News in Marathi | Kokan Current News Updates in ...

बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होतीये वाढ

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असली तरीदेखील दुसरीकडे मात्र बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सध्या रिकव्हरी दर सुधारत असून, हा आकडा 41.39 टक्क्यांवर गेला आहे. तर देशात असे काही राज्य आहेत ते कोरोनामुक्त झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या काही केला कमी होताना दिसत नाही. सध्या महाराष्ट्रात 44,582 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 30482 ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर 857 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असली तरी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increases in India Now 125101 Patients