The number of dead in Balochistan blast was 130
The number of dead in Balochistan blast was 130

बलुचिस्तान स्फोटातील मृतांची संख्या 130 वर

पेशावर- पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात शुक्रवारी झालेल्या भीषण बॉंबहल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 130 वर पोचली आहे. या हल्ल्यात सुमारे दोनशेहून अधिक जण जखमी झाले असून, त्यापैकी 20 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे संभाव्य हल्ले टाळण्यासाठी पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी "इसिस'ने स्वीकारली आहे. 

पाकिस्तानात शुक्रवारी दोन ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारसभांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. बलुचिस्तान प्रांतात मस्तंग भागातील बलुचिस्तान अवामी पार्टीच्या निवडणूक प्रचार सभेत दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉंबहल्ल्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यासह सुमारे 130 जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली, तर जखमी झालेल्यांपैकी अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यामुळे बलुचिस्तान शहरांतील सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे. 

खैबर-पख्तुंख्वा प्रांतातही शुक्रवारी सभेच्या ठिकाणापासून जवळच आत्मघाती बॉंबहल्ला झाला होता. त्यात पाच जण ठार झाले होते, तर अनेक जण जखमी झाले होते. 

पाकमधील सुरक्षेची स्थिती चिंताजनक 
दरम्यान, पाकिस्तानातील सुरक्षाव्यवस्थेची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून, वाढते दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज पाकिस्तानी माध्यमांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीतील उमेदवारांना तातडीने सुरक्षाव्यवस्था पुरविण्याची गरज आहे, असे डॉन वृत्तपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दहशतवादविरोधी विभागाच्या समन्वय प्रमुखांना पाचारण केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com