Nupur Sharma: न्यायाधीशांवरील वैयक्तिक हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत - परडीवाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परडीवाला

न्यायाधीशांवरील वैयक्तिक हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत - परडीवाला

नवी दिल्ली : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) हीने मोहम्मद पैगंबरावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे देशभर तणाव निर्माण झाला आहे. तिच्याबरोबर नवीन जिंदाल याच्यावरही पक्षाने कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. पण नुपूर शर्मा हीच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे राजस्थानमधील उदयपूर आणि अमरावती येथील एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे त्यामुळे हे प्रकरण सध्या वादात आहे.

याप्रकरणी सर्वोच्च न्यायलयाने नुपूर शर्मा हीने देशाची माफी मागायला हवी असं सांगितलं होतं. कोर्टाच्या या निर्णयावर सोशल मीडियामध्ये न्यायमूर्तीवर वैयक्तिक टीका करण्यात आली आहे. यानंतर न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांनी नेटकऱ्यांना सुनावलं आहे.

(Nupur Sharma Case Updates)

हेही वाचा: बंडखोर आमदारांची गोव्यात हेरगिरी? विद्यार्थिनींसह 3 जण ताब्यात

दरम्यान, न्यायमूर्तीवर झालेल्या टीकेवर बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांनी मीडिया ट्रायल हे कायद्यासाठी घातक असल्याचं सागितलं आहे. अशा प्रकरणासंबंधी सोशल मीडियावर कठोर निर्बंधांची त्यांनी मागणी केली आहे. न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आपल्या एका भाषणात म्हणाले की, "सोशल मीडियावर विषयाची सत्यता आणि माहिती नसलेल्या लोकांची भरती आहे. येथील लोकांना कायद्याचे नियम, पुरावे, न्यायालयीन प्रक्रिया माहिती नसतात. त्यामुळे सोशल मीडिया हे घातक आहे." असं ते म्हणाले आहेत.

"एखाद्या संवेदनशील विषयाची मीडिया ट्रायल होणे हे कायद्यासाठी घातक आहे. अशा विषयाच्या ट्रायल या कोर्टाने केल्या पाहिजेत. मीडियामध्ये अशा विषयांसंदर्भात पुरावे नसतात. जेव्हा अर्धसत्य मीडियाद्वारे पसरते तेव्हा लक्ष्मण रेषा ओलांडली जाते." असंही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर, "न्यायालयांनी नेहमीच घटनात्मक आणि योग्य माहिती स्विकारली असून त्यामध्ये मतमतांतरे आणि टीका होऊ शकतात त्यामुळे न्यायाधीशांवरील वैयक्तिक हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत." असं न्यायमूर्ती परडीवाला म्हणाले.

हेही वाचा: बंडखोर आमदारांची हेरगिरी प्रकरण; राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांना जामीन

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदाल आणि नुपूर शर्मा हीने मोहम्मद पैगंबरावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून भारताला जगभरातील टिकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर याविरोधात देशभरातही बरेच आंदोलने करण्यात आले होते. यानंतर नुपूर शर्मा हीच्या वक्तव्याचं समर्थन केल्याप्रकरणी देशात दोन हत्या झाल्या आहेत. या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात आला आहे.

Web Title: Nupur Sharma Case Supreme Court Judge Jb Pardiwala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supreme Court