बंडखोर आमदारांची हेरगिरी प्रकरण; राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांना जामीन

बंडखोर आमदारांची हेरगिरी केल्याप्रकरणी काल गोव्यातील ताज हॉटेलमधून तिघांना अटक करण्यात आली होती.
Goa Police
Goa PoliceSakal

पणजी : काल गोव्यातील ताज हॉटेमधून दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रातील शिंदे गटातील आमदार या हॉटेलमध्ये दोन दिवस मुक्कामाल होते. या आमदारांची हेरगिरी केल्याचा आरोप या दोघांवर होता म्हणून त्यांना गोवा पोलिसांनी काल अटक केली होती. अटक करण्यात आलेले दोघेही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान या आरोपींना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Goa court grants bail to 2 NCP workers)

दरम्यान एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील बंडखोर आमदार गोवा येथे थांबले असताना त्यांच्यावर हेरगिरी केल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये एक राष्ट्रवादी महिला विद्यार्थी संघटनेची विद्यार्थीनी सोनिया दुहान आणि श्रेय कोठियाल असल्याचं उघड झालं होतं. फेक ओळखपत्रावर हॉटेलमध्ये थांबल्याच्या कारणावरून त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. या दोघांना आज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

Goa Police
बंडखोर आमदारांची गोव्यात हेरगिरी? विद्यार्थिनींसह 3 जण ताब्यात

अटक करण्यात आलेल्या सोनिया हिचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत. दरम्यान शरद पवार यांच्यासोबत तिचे फोटो चौकशीत समोर आले होते. बंडखोर आमदारांच्या गोटात काय कट रचले जातात यावर हेरगिरी करण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना पाठवल्याचं बोललं जातंय.

Goa Police
झिरवाळांबाबतच्या 'त्या' विधानावर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेच्या निकालानंतर शिवसेनेशी बंड केले होते. ते आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम आसाम राज्यातील गुवाहटी येथे हलवला. त्यानंतर तिथे ७ दिवस थांबल्यानंतर सत्तास्थापनेची चिन्हे स्पष्ट झाल्यावर बंडखोर आमदार गोव्यातील ताज हॉटेलमध्ये आले होते. तेथे बंडखोर आमदार दोन दिवस होते. त्यावेळी आमदारांची हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिघांना अटक करण्यात आली होती.

अटक करण्यात आलेले आरोपी हे हरियाणा आणि उत्तराखंड येथील असून ते फेक ओळखपत्रावर हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर आज गोव्यातील न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com