Crime: धक्कादायक! बाथरूमला जाऊ दिलं नाही म्हणून मुलाने पँन्टमध्ये लघवी केली; संतापात शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या गुप्तांगाला चटके दिले

Teacher burns Student private part: एका ५ वर्षांच्या नर्सरीतील विद्यार्थ्याच्या गुप्तांगाला त्याच्या शाळेतील शिक्षकाने चटका दिला. मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
Teacher burns Student private part

Teacher burns Student private part

ESakal

Updated on

शाळांमध्ये शिक्षक आणि मुलांमध्ये चांगला संवाद असणे शिक्षणासाठी पोषक वातावरण असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र वाराणसीच्या पांडेपूर परिसरात एका शिक्षिकेने नर्सरीतील एका मुलासोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारे वर्तन केले. स्वच्छतागृहाचा वापर करण्याची परवानगी नाकारल्याने त्या मुलाने आपल्या पॅन्टमध्येच लघवी केली. संतापलेल्या शिक्षिकेने चाकू आगीवर तापवून मुलाचे गुप्तांग जाळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com