पनीरसेल्वम तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

चेन्नई: जयललिता यांच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात मध्यरात्री सव्वा वाजता ओ पनीरसेल्वम यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.

जयललिता यांच्या निधनाची घोषणा अपोलो हॉस्पिटलमधून सोमवारी रात्री ११.३० वाजता झाली. त्यानंतर एआयएडीएमके पक्षाची तातडीची बैठक झाली. बैठकीनंतर आमदारांनी थेट राजभवन गाठले. तेथे राज्यपालांनी पनीरसेल्वम यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

पनीरसेल्वम यापूर्वी दोनवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले आहेत. २००१ ते २००२ ही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा पहिली वेळ. त्यानंतर सप्टेंबर २०१४ ते मे २०१५ या काळात सर्वोच्च न्यायालयाने जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्यावर हा कार्यभार पुन्हा पनीरसेल्वम यांच्याकडे आला. या काळात त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला. खुर्चीवर जयललिता यांचा फोटो ठेवून त्याशेजारी नव्या खुर्चीवर बसून कारभार केला.

Web Title: O Paneerselvam takes oath as new TN CM