कोविडशी लढाई, गावांसाठी केंद्राने आखला विशेष प्लान

समजून घ्या गावांसाठी काय आहे योजना?
Covid Center
Covid Centeresakal
Updated on

नवी दिल्ली: देशातील ५१६ जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यापेक्षा जास्त असून ग्रामीण भागात मृत्यूदरही वाढला आहे. कोरोना व्हायरसच्या साथीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना तीन स्तरीय आरोग्य यंत्रणा उभारण्याचे (three tier response plan) निर्देश दिले आहेत. यात गावांमध्ये ३० बेडचे कोविड केअर सेंटर (covid care center) असून प्रत्येक सेंटरमध्ये कमीत कमी दोन ऑक्सिजन सिलिंडर असले पाहिजेत. (O2 beds in villages push to testing Centre draws up three tier response plan)

Covid Center
मुंबईत वरळी कोळीवाडा, दादर हिंदमाता भागात पाणी भरलं

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी शाळा, कम्युनिटी हॉल्स आणि पंचायत इमारतींना कोविंड केअर सेंटरमध्ये बदलण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, कम्युनिटी आरोग्य केंद्र आणि उप जिल्हा रुग्णालय हा ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे. सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्रांवर रॅपिड अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध करुन देण्याची शिफरास मार्गदर्शतत्त्वांमध्ये करण्यात आली आहे.

Covid Center
Video: विरारमध्ये हळदी समारंभात तुफान राडा

गावात उभारण्यात येणाऱ्या ३० बेडच्या कोविड सेंटरमध्ये श्वसन विकार, ९४ टक्क्यापेक्षा जास्त ऑक्सिजन सॅच्युरेशन असलेले रुग्ण आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. कम्युनिटी आरोग्य अधिकाऱ्याला रॅपिड अँटिजेन चाचण्यांसाठी प्रशिक्षित करण्यात येईल. आशा किंवा अंगणवाडी कर्मचारी आरोग्य टीमला मदत करतील, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

जिल्हा यंत्रणा कोविड केंद्रातील प्रत्येक १० बेडसाठी पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध करुन देतील. दोन पाच लीटरचे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असतील. २४ तास ऑक्सिजनची व्यवस्था असलेली रुग्णवाहिकाही कोविड केंद्रांवर तयार ठेवण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com