न्यूझीलंडच्या संसदेत संस्कृतमध्ये शपथ

पीटीआय
Thursday, 26 November 2020

न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले भारतीय वंशाचे डॉक्टर गौरव शर्मा (वय ३३) यांनी आज येथील संसदेत संस्कृतमध्ये शपथ घेतली. शर्मा हे न्यूझीलंडच्या सर्वांत युवा खासदारांपैकी एक आहेत. शर्मा यांनी पश्‍चिम हॅमिल्टन येथून मजूर पक्षातर्फे निवडणूक लढवित विजय मिळविला आहे.

ऑकलंड - न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले भारतीय वंशाचे डॉक्टर गौरव शर्मा (वय ३३) यांनी आज येथील संसदेत संस्कृतमध्ये शपथ घेतली. शर्मा हे न्यूझीलंडच्या सर्वांत युवा खासदारांपैकी एक आहेत. शर्मा यांनी पश्‍चिम हॅमिल्टन येथून मजूर पक्षातर्फे निवडणूक लढवित विजय मिळविला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. गौरव शर्मा हे मूळ हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील रहिवासी आहेत. निवडून आल्यावर त्यांनी आज संसदेत प्रथम न्यूझीलंडच्या स्थानिक माओरी भाषेतून आणि नंतर संस्कृतमधून शपथ घेतली. शर्मा यांनी न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही देशांच्या भाषिक परंपरेचा मान राखल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. ‘तुम्ही हिंदीतून शपथ का नाही घेतली’ असा प्रश्‍न त्यांना ट्वीटरवर एकाने विचारला असता, त्यांनी ‘सर्वांनाच खूश ठेवणे अवघड असते. त्यामुळे भारतातील बहुतेक सर्व भाषांची जननी मानल्या जाणाऱ्या संस्कृतमधून शपथ घेतली,’ असे उत्तर शर्मा यांनी दिले. 

43 अ‍ॅपवर बंदी घातल्याने बिथरला चीन; भारतावर केले गंभीर आरोप

शर्मा यांनी ऑकलंड येथून एमबीबीएस केले असून वॉशिंग्टन येथून एमबीए केले आहे. ते सध्या हॅमिल्टनमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांनी न्यूझीलंडसह, स्पेन, अमेरिका, व्हीएतनाम, मंगोलिया, स्वित्झर्लंड आणि भारतात सार्वजनिक आरोग्य, आरोग्य धोरण, औषधे या बाबत सल्ला देण्याचे काम केले आहे. त्यांनी २०१७ मध्येही निवडणूक लढविली होती. मात्र त्यावेळी ते अपयशी ठरले होते. 

मॉडर्नाचे शास्त्रज्ञ म्हणतात, 94 टक्के प्रभावी लससुद्धा रोखू शकणार नाही संसर्ग

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्या मंत्रिमंडळात प्रियांका राधाकृष्णन या भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oath in Sanskrit in the Parliament of New Zealand