केशव मौर्य मुख्यमंत्री होतील अशी ओबीसींना आशा होती 

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

ओम प्रकाश राजभर हे उत्तर प्रदेशातील भारतीय समाज पार्टीचे प्रमुख आहेत. त्यांच्या पक्षाचे चार आमदार निवडून आले असून, उत्तर प्रदेशात भाजप सोबत त्यांनी युती केली आहे. या युतीमुळेच त्यांना कॅबीनेट मंत्री बनविण्यात आले आहे. 

लखनऊ : उत्तर प्रदेशातील पोटनिवडणूकीत विरोधकांनी केलेल्या एकजुटीमुळे भाजपाला कैराना आणि नूरपुर मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे उत्तर प्रदेश भाजपमधील गटतट समोर यायला सुरूवात झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्री मंडळातील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्यांना मुख्यमंत्री न केल्यामुळेच भाजपची पिछेहाट सुरू झाल्याचे खळबळ जनक वक्तव्य केले आहे. मौर्यांना मुख्यमंत्री केले असते तर पोटनिवडणूकीत भाजपला हार माणावी लागली नसती. असे राजभर म्हणाले. 

ओम प्रकाश राजभर हे उत्तर प्रदेशातील भारतीय समाज पार्टीचे प्रमुख आहेत. त्यांच्या पक्षाचे चार आमदार निवडून आले असून, उत्तर प्रदेशात भाजप सोबत त्यांनी युती केली आहे. या युतीमुळेच त्यांना कॅबीनेट मंत्री बनविण्यात आले आहे. 

उत्तर प्रदेशात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच मौर्य यांना भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणले आहे. राजभर म्हणाले, "उत्तर प्रदेशातील ओबीसी समाजाने भाजपला साथ दिली कारण त्यांना मौर्य यांना मुख्यमंत्री बनवायचे होते. परंतु, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. यामुळे बहुसंख्य ओबीसी समाज नाराज झाला होता. त्याचा परिणाम कैराना आणि नूरपुर मतदारसंघातील पोटनिवडणूकीत भाजपला मिळालेल्या पराभवात दिसून आला. भाजपने त्यांच्या पराभवाची कारणे शोधली पाहिजेत. राज्याच्या प्रमुखपदी योगी आदित्यनाथ यांना बसवायचे की केशव मौर्य यांना याचा निर्णय पक्षाने घ्यावा."

Web Title: OBC had the hope that Keshav Maurya would be the CM