झोपडपट्टीवासीयांत लठ्ठपणा अन्‌ स्थुलत्व 

पीटीआय
बुधवार, 9 मे 2018

राजधानी दिल्लीत झोपडपट्टीमध्ये राहणारे; पण वैद्यकीय परिभाषेमध्ये ज्यांना सुदृढ समजण्यात आले होते अशी मंडळी प्रत्यक्षात मात्र लठ्ठपणा आणि स्थुलत्व या आजारांनी ग्रस्त असल्याचे ताज्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत झोपडपट्टीमध्ये राहणारे; पण वैद्यकीय परिभाषेमध्ये ज्यांना सुदृढ समजण्यात आले होते अशी मंडळी प्रत्यक्षात मात्र लठ्ठपणा आणि स्थुलत्व या आजारांनी ग्रस्त असल्याचे ताज्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

अर्ध्यापेक्षा अधिक मंडळी ही लठ्ठ असून, 17.2 टक्के लोकांना स्थुलत्वाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही समस्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी अधिक हानिकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागातील 20.1 टक्के मंडळी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात; तर 37.3 टक्के लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. 
वैद्यकीय संशोधकांनी "बॉडी मास इंडेक्‍स' तयार करण्यासाठी तब्बल 500 लोकांचा अभ्यास केला होता. यामध्ये स्थुलत्व, रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण आदी बाबींचे मोजमाप करण्यात आले होते. "बात्रा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर'मधील संशोधक आणि डॉक्‍टरांनी या एका विशेष कॅंपचे आयोजन केले होते. यामध्ये हा अभ्यास करण्यात आला. काही लोकांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाणही धोकादायक पातळीवर आढळले आहे. 

निम्न उत्पन्न गट 

या वैद्यकीय संशोधनात केंद्रस्थानी असणारी मंडळी ही निम्न उत्पन्न गटातील होती, हे सर्वजण रोजंदारीवर काम करतात, ज्यांचा अभ्यास करण्यात आला होता, ते सर्वजण 25 ते 44 वर्षे वयोगटातील आहेत. याच भागामध्ये आरोग्य शिक्षण आणि लोकांमध्ये आजारांबाबत जनजागृती करणे अत्यावश्‍यक असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

Web Title: Obesity and mobility in the slums