
आरोपी असणारा तांत्रिक फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे
धक्कादायक! मुलासमोर आईवर सलग ७९ दिवस अत्याचार, तांत्रिकाचे कृत्य
ओडिशातील बालासोर जिल्ह्यात एका विवाहित महिलेवर तिच्या अडीच वर्षांच्या मुलासमोर तांत्रिकाने 79 दिवस अत्याचाक केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात पोलिसांनी शनिवारी माहिती दिली आहे. दरम्यान, या घटनेत मुलाची बंद खोलीतून सुटका करण्यात आली आहे. मात्र आरोपी असणारा तांत्रिक फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
या घटेबाबत महिलेने सांगितलेली माहिती अशी की, पिडीत महिलेचे 2017 मध्ये तिचे लग्न झाले होते आणि तिचे सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. संबंधित महिला काही महिने माझ्यासोबत राहिली तर ही समस्या सुटेल असे आश्वासन त्या तांत्रिकाने कुटुंबाला दिले होते. पीडितेने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, जेव्हा तिने तांत्रिकासोबत राहण्यास नकार दिला तेव्हा तिच्या सासूने तिला गुंगीचे औषध दिले आणि नंतर शुद्धीवर आल्यावर ती तिच्या मुलासोबत तांत्रिकाच्या खोलीत दिसली.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती, तांत्रिकाने महिलेवर खोलीत 79 दिवस वारंवार अत्याचार केला आहे. 28 एप्रिलला तांत्रिक मोबाईल रूममध्ये विसरला होता. त्यानंतर त्या महिलेने आई-वडिलांना फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पालकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तांत्रिकाने तिथून पळ काढला होता. घटनेसंदर्भात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि इतर आरोपांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने एफआयआरमध्ये तिचा पती, मेहुणा आणि इतर सासरची नावे दिली आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.