

Flood Havoc in Odisha and Assam 78 Killed Thousands Evacuated as Rivers Cross Danger Mark After Heavy Rain
sakal
भुवनेश्वर/गुवाहाटी : मुसळधार पावसामुळे ओडिशा आणि आसाममध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. ओडिशात तिघांचा मृत्यू झाला असून दोन लाखांहून अधिक नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. तर आसाममध्ये आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने पुरातील मृतांचा आकडा ७५ वर पोचला आहे. आसाममधील ३.३२ लाख नागरिक अजूनही पुराच्या तडाख्यात अडकलेले आहेत.