Odisha Train Crash : ओडिसा रेल्वे अपघातप्रकरणात नवा ट्विस्ट? CBIच्या चौकशीनंतर ज्युनिअर इंजीनियर कुटुंबासह बेपत्ता

odisha trainaccident
odisha trainaccident esakal

ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघात प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित एक सिग्नल ज्युनिअर इंजीनियर कुटुंबासह अचानक बेपत्ता झाला आहे.

१९ जून रोजी सीबीआयचे पथक बालासोर येथील त्यांचे घर सील करण्यासाठी गेले होते. यादरम्यान तो घरी नव्हता. तसेच कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित नव्हते. प्राथमिक तपासादरम्यान सीबीआयने या अभियंत्याची चौकशी केल्याचे वृत्त आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, १६ जूनला बालासोरला भेट दिल्यानंतर १९ जूनला सीबीआयची टीम पुन्हा एकदा बालासोरला गेली होती. त्यावेळी सोरो येथील अन्नपूर्णा राईस मिलजवळील सिग्नल जूनियर इंजीनियरचे भाड्याचे घर सील करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याचे नाव आमिर खान असे असून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयचे दोन कर्मचारीही त्याच्या घरावर लक्ष ठेवून आहेत.

odisha trainaccident
Weather Update : राज्यात मान्सून कधी सक्रीय होणार? मुंबईत 'या' दिवशी बरसणार पाऊस; हवामान खात्याने दिली माहिती

ट्रेनच्या सुरक्षित प्रवासाकरिता सिग्नल ज्युनिअर इंजीनियरची भूमिका खूप महत्वाची असते. सिग्नल, ट्रॅक सर्किट्स, पॉइंट मशीन्स आणि इंटरलॉकिंग सिस्टीमसह सिग्नलिंग उपकरणे इंस्टॉल करणे, तसेच त्यांची देखभाल आणि दुरुस्ती यामध्येही त्यांचा सहभाग असतो. सिग्नल ज्युनिअर इंजीनियरची भूमिकाही रेल्वेमधील विभाग किंवा झोननुसार काहीशी वेगळी असू शकते.

odisha trainaccident
Shiv Sena : पब्लिक डिमांड! शिंदेंच्या 'त्या' कृतीची दखल घ्या; राऊतांचं थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

मृतांची संख्या वाढली

रिपोर्टनुसार, १८ जून रोजी बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९२ वर पोहोचली आहे. पश्चिम बंगालमधील एका २४ वर्षीय प्रवाशाचा कटक येथील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी रेल्वे बोर्डाचे एक पत्र समोर आले होते. ज्यामध्ये बोर्डाने अपघाताच्या दोन महिने आधी एप्रिलमध्ये सर्व झोन प्रमुखांना इशारा दिला होता. त्यात जानेवारी ते एप्रिल या कालावधीतील पाच घटनांचा उल्लेख करण्यात आला होता.

ज्यामध्ये देखभाल किंवा निष्काळजीपणा केल्यानंतर तपासल्याशिवाय सिग्नल गीअर्स जोडल्या गेल्याच्या घटनांचा समावेश होता. याबाबत झोन प्रमुखांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना शॉर्टकट पद्धती टाळण्याच्या सूचना देण्यास सांगण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com