Odisha Crime : खरेखुरे बंटी-बबली! कारनाम्यांमुळे सरकार पडायची वेळ आली...

दोघे सामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यांनी अनेक मोठमोठ्या नेत्यांना जेरीस आणलं आहे.
Odisha Government
Odisha GovernmentSakal

ओडिसातल्या एका जोडप्याने पूर्ण राज्यामध्ये खळबळ माजवली आहे. या दोघांकडे वीसपेक्षा जास्त असे व्हिडीओ आहेत, ज्याच्या साहाय्याने ते अनेक मोठमोठ्या लोकांना ब्लॅकमेल करत आहेत. या जोडप्याकडे असलेले व्हिडीओ व्हायरल झाले तर सरकारही पडण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. नक्की काय आहे हा प्रकार? कोण आहे हे जोडपं? जाणून घ्या...

लेटेस्ट मोबाईल, नवी फॉर्च्युनर गाडी, गळ्यात सोन्याचे दागिने, घरी आलिशान फर्निचर...हे सगळं या जोडप्याकडे पाहायला मिळतं. अर्चना नाग चंद, जगबंधू चंद अशी या दोघांची नावं आहेत. ही दोघंही ओडिसामधल्या एका अगदीच सामान्य कुटुंबातून आले आहेत. हे दोघेही खऱ्या आयुष्यातले बंटी बबली आहेत. हनीट्रॅप, फसवणूक, ब्लॅकमेलिंग हाच जणू या दोघांचा व्यवसाय आहे. पोलिसांनी सध्या या दोघांना ताब्यात घेतलं आहे. मात्र या दोघांकडे अनेक मोठमोठ्या नेत्यांची, उद्योगपतींची मोठी सिक्रेट्स असल्याचं सांगितलं जात आहे.

Odisha Government
Pune Crime : फरार गुन्हेगाराची निर्घृण हत्या; दुचाकीला धडक देत धारदार शस्त्राने वार

कसा झाला खुलासा?

या जोडप्याकडे सत्ताधारी बीजेडी, भाजपा नेते, अधिकारी, उद्योगपती आणि इतर विविध क्षेत्रातल्या मोठ्या लोकांचे २० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो आहेत. हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा एका फिल्ममेकरने या जोडप्याच्या विरोधात तक्रार दिली. फिल्ममेकर अक्षय परीजा यांच्यावर अर्चनाने कास्टिंग काऊचचा आरोप केला आणि त्यानंतर प्रकरण थंड करण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली. पण अक्षयने घाबरून न जाता थेट न्यायालयात खटलाच दाखल केला. तीन कोटी दिले नाहीत तर तुला मारून तुझे तुकडे करीन अशी धमकी या जो़डप्याने दिली.

तर याच जोडप्याच्या विरोधात एका मुलीनेही तक्रार दिली होती, ज्यामध्ये तिने लिहिलं होतं की अर्चनाने फसवणूक करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ शूट केले आहेत आणि तिलाच अक्षय परीजासोबत जवळीक वाढवून त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. या जोडप्याने मुलीला जेवायला बोलावलं आणि तिच्या जेवणात काहीतरी नशेचा पदार्थ मिसळला, त्यानंतर जेव्हा तिला शुद्ध आली, तेव्हा तिच्यावर एकही कपडा नसल्याचं आढळून आलं.

Odisha Government
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल

कशी होती यांची गुन्हा करण्याची पद्धत?

या जोडप्यापैकी जगबंधू स्वतःला एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता सांगायचा आणि अर्चना आपण वकील असल्याचं सांगायची. दोघंही लोकांना आपल्या घरी जेवायला बोलवायचे, त्यानंतर त्यांच्या जेवणात नशेचं औषध मिसळायचे किंवा शरीराच्या मोहात पाडायचे आणि सिक्रेट कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करायचे. त्यानंतर त्या फोटो आणि व्हिडीओच्या साहाय्याने ब्लॅकमेलिंग आणि वसुली केली जायची. त्यांनी सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्षाचे मोठमोठे नेते, प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती अशा सर्वच क्षेत्रातल्या नेत्यांना या दोघांनी आपल्या हनीट्रॅपमध्ये अडकवलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com