
'एल अँड टी' कटकमध्ये उभारणार रुग्णालय; ओडीशा सरकारतर्फे कंत्राट
मुंबई : एल अँड टी कन्स्ट्रक्शन्सला (Larsen and Toubro) ओडिशा सरकारतर्फे (Odisha Government) सुसज्ज रुग्णालय (Well Equipped hospital) व त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा (Basic facilities) उभारण्याचे काम देण्यात आले आहे. कटक (Cuttack) येथे सुमारे ३५ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा कालावधी (project tenure) ३० महिने आहे. तळघर, तळमजला अधिक नऊ मजल्यांचे हे बांधकाम आहे. त्याची एकंदर किंमत अडीच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
हेही वाचा: पालघर पोलिसांचं मिशन ऑलआऊट; विविध गुन्ह्यांतील 12 आरोपींना अटक
या रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागांमध्ये दोन हजार ५८ खाटा असतील. सुसज्ज रुग्णालयाबरोबरच त्यातील इलेक्ट्रिकल यंत्रणा, सीसीटीव्ही, किचन-लाँड्री, कारपार्किंग, पाणी व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशामन यंत्रणा, वॉटर स्प्रे, बॉयलर, एलपीजी जोडणी, स्वयंचलित कचरा व्यवस्थापन यंत्रणा, मालमत्ता व्यवस्थापन यंत्रणा, वैद्यकीय न्यूमॅटीक ट्यूब यंत्रणा, अंतर्गत उर्जानिर्मितीसाठी सौरपॅनल आदींच्या उभारणीच्या कामाचा तसेच नंतर त्यांची पाच वर्षे देखभाल यांचाही यात समावेश आहे.
लार्सन अँड टूब्रो ही अभियांत्रिकी, बांधकाम, आयटी, अर्थ या सेवा देणारी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगभरात 50 हून अधिक देशांमध्ये कंपनीचे काम चालते. मजबूत ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि सर्वोत्तम गुणवत्ता यामुळे एल अँड टी त्यांच्या सगळ्या महत्वाच्या व्यवसायात गेली आठ दशके आघाडीवर राहिली आहे.
Web Title: Odisha Government Larsen And Toubro Well Equipped Hospital Cuttack Thirty Months Project Tenure
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..