

Drone Video Goes Viral as Exam Conducted on Airport Runway in Odisha
Esakal
ओडिशात होमगार्डच्या भरती परीक्षेसाठी ८ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानं त्यांची परीक्षा विमानतळाच्या धावपट्टीवर घेण्याची वेळ प्रशासनावर आली. या परीक्षेचा ड्रोन व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. १६ डिसेंबर रोजी ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी ८ हजार जण आले होते आणि पदांची संख्या १८७ इतकी होती. जमादारपाली विमानतळावर ही परीक्षा झाली.