Odisha Viral Video
esakal
Odisha Viral Video : ओडिशातील पुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन व्याख्याता (Puri lecturer) असलेल्या एका व्यक्तीनं अनैतिक संबंधांच्या संशयावरून आपल्या पत्नीवर आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणावर निर्दय हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघांचे कपडे फाडून त्यांना अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरून फिरवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी आरोपी व्याख्यात्यासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.