Odisha Crime Case : ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील कुलियाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या नुआगावात एक धक्कादायक दुहेरी हत्याकांड (Mayurbhanj Woman Killing) उघडकीस आले आहे. १९ जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन महिलांचे कुजलेले मृतदेह त्यांच्या घराच्या मागे पुरलेले आढळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.