भुवनेश्वर : ओडिशातील जगतसिंगपूर जिल्ह्यात एका दुर्मिळ आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून उल्लेखनीय घटनेची नोंद झाली आहे. नुआगाव येथील २४ वर्षीय सरस्वती नायक (Saraswati Nayak) या महिलेने सिझेरियन (Cesarean) शस्त्रक्रियेशिवाय तब्बल ५.५ किलो वजनाच्या बाळाला सुरक्षितरित्या जन्म दिला आहे. ही घटना संपूर्ण राज्यासाठी एक अभूतपूर्व वैद्यकीय चमत्कार मानली जात आहे.