विद्यार्थ्यांच्या 'धूम'वर बंदी; बाईक चालविण्यावर सरकारचे निर्बंध!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 डिसेंबर 2019

शालेय मुलांनी वाहन चालवल्याने केवळ अपघातच होत नाहीत; तर शाळांमध्ये मोटारसायकल चालल्याने भेदभाव निर्माण होतो.

भुवनेश्‍वर : राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून नवीन मोटार वाहन कायदा मंजूर करण्यात आला असून, विद्यार्थ्यांवर मोटारसायकल चालविण्यास ओडिशा सरकारने निर्बंध घातले आहेत. याबाबतचा निर्णय राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठकीत घेण्यात आला. भारत

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ओडिशा सरकारने कायदा मंजूर केल्यानंतर राज्यातील उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने या संदर्भात राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना केली आहे.

- अटलजींचा 25 फूट उंचीचा अष्टधातूंचा पुतळा; एवढा आला एकूण खर्च

या पत्रातून राज्यातील स्कूल बस धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये पोहोचण्यासाठी मोटारसायकलचा वापर करू नये, याची काळजी घेण्याची सूचनाही मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. 

- भारत आणि पाकिस्तान धोनीसाठी बघा 'असे' आले एकत्र!

या कायद्यानुसार शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांविषयीदेखील काही सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार तीन चाकी वाहनाने विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना नेऊ नये आणि राज्य रस्ते सुरक्षा परिषदेने ठरविलेल्या रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, कोणी कायदा मोडला तर मुख्याध्यापकाने तत्काळ आरटीओंकडे याची तक्रार करावी, अशा सूचनाही संचालनालयाने पाठवलेल्या पत्रात देण्यात आल्या आहेत. 

- Video : 'सीएए के सम्मान में, पुणेकर मैदान में'; शहरात विविध ठिकाणी मानवी साखळी!

या निर्देशाविषयी बोलताना शिक्षणतज्ज्ञ प्रीतीश आचार्य म्हणाले की, शालेय मुलांनी वाहन चालवल्याने केवळ अपघातच होत नाहीत; तर शाळांमध्ये मोटारसायकल चालल्याने भेदभाव निर्माण होतो. त्याचा त्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. नियम लागू करण्यासाठी केवळ सरकारच नाही, तर विद्यार्थ्यांच्या पालकांनीदेखील याची खात्री करून घ्यावी की, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी वाहन चालवू नये. कारण, सर्वांनी सहकार्य केले नाही तर नियम लागू केले जाऊ शकत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Odisha state government has banned students from riding bikes