भारत आणि पाकिस्तान धोनीसाठी बघा 'असे' आले एकत्र!

वृत्तसंस्था
बुधवार, 25 डिसेंबर 2019

यासर्वांपैकी सर्वोत्तम कर्णधार निवडणे म्हणजे फारच अवघड काम मात्र, चाहत्यांनी यात महेंद्रसिंह धोनीलाच पसंती दिली आहे. त्याचे नाव फक्त भारतीय क्रिकेटप्रेमींनीच नाही तर पाकिस्तानमधील चाहत्यांनीसुद्धा ठामपणे घेतले.  

नवी दिल्ली : जसे आता दशक सरु लागले आहे तसे दशकतील सर्वोत्तम संघ, सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम कर्णधार जाहीर केले जाऊ लागले आहेत. आयसीसीनेसुद्धा दशकातील सर्वोत्तम कर्णधार कोण असा प्रश्न विचारताच जगभरातील प्रेक्षकांनी एकमताने महेंद्रसिंह धोनीचे नाव घेतले आहे. 

यंदाच्या वर्षांत क्रिकेटने धोनी, मायकेल क्लार्क, ब्रेंडन मॅकलम, केन विल्यम्सन, विराट कोहली असे अनेक उत्तम कर्णधार पाहिले. यातील काहींनी निवृत्ती घेतली तर काही अजूनही खेळत आहेत. 

यासर्वांपैकी सर्वोत्तम कर्णधार निवडणे म्हणजे फारच अवघड काम मात्र, चाहत्यांनी यात महेंद्रसिंह धोनीलाच पसंती दिली आहे. त्याचे नाव फक्त भारतीय क्रिकेटप्रेमींनीच नाही तर पाकिस्तानमधील चाहत्यांनीसुद्धा ठामपणे घेतले.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian And Pakistani Fans Join Hands To Pick MS Dhoni As ICC Best captain of decade