

A woman from Gujarat, owner of an IT firm, attempted suicide at Bhadrak Police Station, Odisha, after alleging that her husband fled with ₹5 crore and police failed to act.
esakal
Summary
ओडिशातील भद्रक जिल्ह्यात गुजरातच्या निरल मोदी हिने पोलिस ठाण्यात फिनाइल प्यायून आत्महत्येचा प्रयत्न केला.
निरल ही एका आयटी कंपनीची मालक असून तिचे लग्न तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या मनोज नायकशी झाले होते.
लग्नानंतर मनोजने निरलला त्याच्या गावी व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त केले.
शनिवारी ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात गुजरातमधील एका महिलेने फिनाइल अमोनियम क्लोराइड प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.तिने तिच्या पतीवर तिचे पैसे घेऊन पळून गेल्याचा आणि पोलिसांनी तिच्या तक्रारीवर कारवाई न केल्याचा आरोप केला.अहमदाबाद येथील रहिवासी निरल मोदी हिने विषारी औषध प्यायलाने तिला ओडिशातील भद्रक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.