"..तेव्हा हिंदू खलनायक का खटकले नाहीत?"; रोहित शेट्टीचा सवाल | Rohit Shetty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Shetty

"..तेव्हा हिंदू खलनायक का खटकले नाहीत?"; रोहित शेट्टीचा सवाल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

रोहित शेट्टी Rohit Shetty दिग्दर्शित 'सूर्यवंशी' Sooryavanshi हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर त्याने तगडी कमाई केली आहे. या चित्रपटाने नुकताच १५० कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये अक्षय कुमार, कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असून रणवीर सिंग आणि अजय देवगण हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शेट्टीने त्याच्या या चित्रपटाविषयी काही गोष्टी उलगडून सांगितल्या. यावेळी त्याने चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित न करता थिएटरमध्येच का प्रदर्शित केला, याचंही उत्तर दिलं.

'द क्विंट'ला दिलेल्या मुलाखतीत रोहितने चित्रपटातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. "माझ्या याआधीच्या चित्रपटांमध्ये हिंदू खलनायक दाखवले गेले. जयकांत शिक्रे हा हिंदू होता, त्यानंतर सिम्बामध्ये पुन्हा महाराष्ट्रीयन खलनायक दाखवला होता. मग तेव्हा त्यावरून प्रश्न का उपस्थित केले नव्हते? काही वृत्तांमध्ये सूर्यवंशी चित्रपटात चांगले मुस्लीम आणि वाईट मुस्लीम अशी कथा दाखवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण ते पूर्णपणे चुकीचं आहे", असं तो म्हणाला. एखाद्या वाईट किंवा चांगल्या व्यक्तीचा संबंध जातीशी लावू नये, असंदेखील त्याने स्पष्ट केलं.

हेही वाचा: 'हा' आहे बिग बॉसच्या आवाजामागचा चेहरा

'सूर्यवंशी' हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. "ओटीटीकडून खूप चांगले ऑफर्स येत असताना थिएटर्समधील प्रदर्शनासाठी थांबणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. पण मला सूर्यवंशी हा थिएटरमध्येच प्रदर्शित करायचा होता. जर सूर्यवंशी हा चित्रपट नसता, तर कदाचित मी हा अट्टहास केला नसता", असं रोहित म्हणाला.

loading image
go to top