CM Siddaramaiah : 'तो' आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन; CM सिद्धरामय्यांचं मोठं विधान, असं काय घडलं?

विपर्यास आणि चुकीचे चित्रण केले जात असल्याबद्दल सिद्धरामय्या यांनी नाराजी व्यक्त केली.
CM Siddaramaiah DK Shivakumar
CM Siddaramaiah DK Shivakumaresakal
Summary

व्हिडिओत बदलीचा विषय नसला तरी खोटा अपप्रचार करण्यात येत असल्याचा सिद्धरामय्या यांनी आरोप केला.

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांचा मुलगा यतिंद्र सिद्धरामय्या मोबाईल फोनवर कथित बदलीबाबत (Officer Transfer) बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

CM Siddaramaiah DK Shivakumar
Teacher Recruitment : राज्यात आणखी 20 हजार शिक्षकांची भरती करणार; शिक्षण खात्याचा मोठा निर्णय, डीएड-बीएडधारकांना संधी

या व्हिडिओत बदलीचा विषय नसला तरी खोटा अपप्रचार करण्यात येत असल्याचा सिद्धरामय्या यांनी आरोप केला. पैसे घेऊन एक जरी बदली केल्याचे दाखवून दिल्यास राजकारणातून निवृत्त होईन, असे त्यांनी आव्हान दिले.

माजी आमदार असलेले त्यांचे पुत्र डॉ. यतिंद्र यांनी फोनवर बोलताना सीएसआर नियडी शाळेच्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत चर्चा केली. त्याचा विपर्यास आणि चुकीचे चित्रण केले जात असल्याबद्दल सिद्धरामय्या यांनी नाराजी व्यक्त केली.

CM Siddaramaiah DK Shivakumar
Maratha Reservation : PM मोदींना भेटल्यावरच मराठा आरक्षणाचा तोडगा निघेल, अन्यथा..; काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

मुख्यमंत्री म्हणाले की, यतिंद्र यांच्या भाषणात कुठेही बदलीचा उल्लेख नाही. यतिंद्र हे वरुणा मतदारसंघातील निवारा समितीचे अध्यक्ष आहेत. सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) च्या माध्यमातून शेतातील शाळांच्या इमारतींची दुरुस्ती केली जात आहे. मंत्री एच. सी. महादेवाप्पा यांनी ही यादी दिली आहे. त्यावर चर्चा केल्याचे यतिंद्र यांनी सांगितले.

CM Siddaramaiah DK Shivakumar
Whale Fish Death : तब्बल 42 तास प्रयत्न करून वाचवलेल्या 'त्या' व्हेल माशाचा कसा झाला मृत्यू? मोठं कारण आलं समोर..

डॉ. यतिंद्र यांच्या संभाषणात अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजप-धजदचे नेते निराशेने अनावश्यक गोंधळ निर्माण करत आहेत.

-डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री

काँग्रेस सरकारचा वसुली कारभार चव्हाट्यावर आला आहे. तुमच्याकडे या आरोपाचे उत्तरच नाही. हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे की, कर्नाटकचा सुपर सीएम? मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.

-एच. डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com