नरेंद्र मोदींचा मुखवटा घ्या 275 रुपयांना !

Namo Mask
Namo Mask

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने पक्षाच्या ट्विटर हॅण्डलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुखवटा विक्रीबद्दल ट्विट केले आहे. मोदींचा मुखवटा 275 रुपयांना उपलब्ध असून, तीन मुखवटे 699 रुपयांना मिळणार आहेत. नमो ऍप्लिकेशवरुन हा मुखवटा विकत घेता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो ऍपवरुन विविध प्रकारच्या वस्तू विकल्या जात असून, यामध्ये कॉफी मग, टी-शर्ट, किचैन्स, टोप्यांचा समावेश आहे. नमो ऍपवरून गेल्या तीन महिन्यांमध्ये 5 कोटींच्या वस्तू विकल्या गेल्या आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नमो ऍपवर मोदींचा मुखवटा विक्रीसाठी ठेवला आहे. यामुळे मोदी चेहरा जास्तीत जास्त व्यक्तींवर पोहचण्यास मदत होईल. नमो ऍपवरून सर्वाधिक खरेदी ही भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधून आणि देशभरातील भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या डिजीटल इंडियाचा फायदा त्यांच्याच वस्तूविक्रीला अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपच्या काही खासदारांनी ‘नमो हुडी चॅलेंज’च्या नावाने नमो ब्रॅण्डचे हुडी घालून फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी नमो ब्रॅण्डच्या वस्तू घेण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे. हिमाचल प्रदेशमधून भाजपचे खासदार असलेल्या अनुराग ठाकूर आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना 'नमो अगेन'ची टीशर्ट घालून ट्विटवर फोटो पोस्ट केले आहेत. ही नमो टी-शर्ट नमो ऍपवर 499 रुपयांना उपलब्ध आहेत.

  • नमो ऍपवरून एकूण विक्री झालेल्या गोष्टी : 15 लाख 75 हजार
  • एकूण कमाई : 5 कोटी 20 लाख
  • टी-शर्टच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई : 2 कोटी 64 लाख 73 हजार 321 रुपये
  • टोप्यांच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई : 56 लाख 2 हजार 865 रुपये
  • किचैन्सच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई : 43 लाख 6 हजार 737 रुपये
  • कॉफी मगच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई : 36 लाख 38 हजार 818 रुपये
  • वह्यांच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई : 32 लाख 20 हजार 583 रुपये
  • पेनच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई : 37 लाख 73 हजार 843 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com