राफेल पुस्तकाच्या जप्तीचे आदेश देणारे आम्ही नव्हेच : निवडणूक आयोग

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

चेन्नई - राफेल घोटाळ्यावर एस विजयन यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रति निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त केल्या. परंतु, मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रता सोहो यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून किंवा कार्यालयाकडून अशा प्रकारचे कोणतेच आदेश देण्यात आलेले नाही.

46 पानांच्या या पुस्तकाचे 'राफेल : लॉन्ड्रिंग ऑफ द नेशन' असे नाव आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर पुस्तकाच्या प्रकाशकाने हे पुस्तक भारती पुस्तकालयात प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

याआधी हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रकाशन संस्थेने एका शाळेशी संपर्क केला होता. मात्र निवडणूक आयोगाने या पुस्तकावर अक्षेप घतल्याचे सांगत शाळा व्यवस्थापनाने पुस्तक प्रकाशनासाठी नकार दिला होता. त्यानंतर भारती प्रकाशनाच्या कार्यालयातच या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. परंतु, कथित निवडणूक आयोगाचे अधिकारी तेथे पोचले आणि त्यांनी पुस्तकाच्या प्रति जप्त केल्या.

यावर प्रकाशनाचे संपादक पीके राजन यांनी हे चूकीचे असून, यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. तसेच यात आचारसंहितेचा भंग होत नसून हे पुस्तक प्रकाशित करणारच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: Officials cops seize book on Rafale